मलकापूर, 31/01/2025 – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, मलकापूर यांनी फौजदारी जामीन क्रमांक 06/2025 मध्ये POCSO कायद्यांतर्गत मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी विष्णू प्रकाश मेसरे यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे.
आरोपी विष्णू प्रकाश मेसरे याच्यावर बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, त्याविरोधात POCSO (The Protection of Children from Sexual Offences Act, 2012) कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. दोषारोप-पत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड. शैलेश जोशी तसेच पीडितेचे वकील ॲड.जी.डी.पाटील यांनी पिडीते तर्फे युक्तिवाद केला व आरोपीला जामीन देण्यास जोरदार विरोध केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकार पक्षातर्फे ॲड. शैलेश जोशी तसेच पीडितेचे वकील ॲड.जी.डी.पाटील यांचा युक्तिवादाचा स्वीकार करत आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने नमूद केले की आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तसेच रिपोर्ट दिल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांकडून पीडितेला व तिच्या कुटुंबीयास वेळोवेळी देण्यात येणाऱ्या धमक्या पाहता आरोपीस जामीन देणे योग्य होणार नाही, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका घेणे आवश्यक असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे महत्त्वाचे आहे
‼️‼️ *ज्वालामुखी न्यूज* ‼️‼️
▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬
🚩 *बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क*🚩
*🔷 दिनेश आसटकार 🔷*
‼️ *संपादक* ‼️
75583 63235
Post a Comment
0 Comments