मलकापूर मधील स्थानिक रहिवासी माता महाकाली नगरातील खाजगी प्लॉटवर कृष्णा प्रकाश मेसरे यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्याबाबत नगरपालिका कार्यालयाकडून कोणतीही बांधकाम परवानगी घेतली नसून किंवा कोणत्याही विभागातून परवानगी घेतली नाही बांधकाम करिता लागणारी 300ब्रास मुरूम व 300 ब्रास रेती विनापरवाना वापरून गौण खनिजाची चोरी केली आहे असे करून यांनी शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे .नगरपालिका कार्यालयातील बांधकाम यांना मी व स्थानिक रहिवासी यांनी वेळोवेळी तोंडी लक्षात आणून सुद्धा नगरपालिकेने कोणतेही कारवाई केलेली नाही.यावरून असे दिसून येते की नगरपालिका कार्यालयातील अधिकारी कृष्णा मेसरे हे पत्रकार असल्यामुळे यांचे कुठेतरी आर्थिक हितसंबंध दिसून येत आहे तरी आपणास विनंती करतो की त्यांनी केलेल्या तीन मजली इमारती चे अवैध बांधकाम तोडण्यात यावे व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्याकडून गौण खनिजाची रक्कम वसूल करण्यात यावी ही नम्र विनंती जर 15 दिवसाच्या आत सदर बांधकाम बाबत गौण खनिज ची चोरी बाबत कार्यवाही झाली नाही तर नाईलाजास्तव मला आमरण उपोषण तथा आत्मदहनाचा मार्ग अवलंबवा लागेल. होणारे सर्व परिणाम संबंधित विभाग जबाबदार राहतील. असा इशारा दिनेश आसटकार उर्फ मुन्ना राठोड यांनी दिलेला आहे.
‼️‼️ *ज्वालामुखी न्यूज* ‼️‼️
▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬
🚩 *बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क*🚩
*🔷 दिनेश आसटकार 🔷*
‼️ *संपादक* ‼️
75583 63235

Post a Comment
0 Comments